Friday, February 25, 2011

फायनान्सची तोंडओळख (भाग ४): घसारा, कॉस्टिंग आणि ब्रेक इव्हन पॉईंट


पहिल्या भागात आपण बघितले की जादूगार राम कुमारने जानेवारी २०११ रोजी आपल्याकडील जादुच्या छड्या विकल्या. अंदाजाप्रमाणे एकूण २०० छड्या प्रत्येकी १५०० रुपयांना विकल्या गेल्या (कारण गुंतवणुकदारांनी मागितलेला व्याजाचा दर % पेक्षा जास्त होता). या व्यवहारात आपल्याला नक्की किती फायदा झाला याचा हिशोब तो करू लागला. छड्या विकून एकूण प्राप्ती झाली १५०० गुणिले २००३,००,००० म्हणजे लाख रुपये. आणि त्यासाठी रामला किती खर्च आला? तो पुढीलप्रमाणे:

. रामला प्रत्येक छडी तयार करण्यासाठी लाकडे आणि विविध रसायने हा कच्चा माल लागे. या कच्च्या मालाची किंमत प्रत्येक छडीमागे प्रत्येकी ९०० रुपये होती. म्हणजे २०० छड्या तयार करायला लागणारा कच्च्या मालाचा खर्च ९०० गुणिले २०० बरोबर ,८०,००० म्हणजे लाख ८० हजार रुपये.
. पेपरात पानभर जाहिरात द्यायला लागलेला खर्च: १०,००० (दहा हजार) रुपये.
. रामने छड्या विकण्यासाठी एक हॉल भाड्याने घेतला. त्या हॉलचे भाडे अर्थातच त्याला द्यावे लागले. तसेच त्याला त्या हॉलमध्ये वीजेचा खर्च आणि इतर काही खर्च झाले. या सगळ्याचा खर्च: ४०,००० (चाळीस हजार) रुपये

म्हणजे एकूण खर्च आला लाख ३० हजार रुपये आणि प्राप्ती झाली लाखाची. म्हणजे एकूण फायदा झाला ७० हजाराचा. फायद्याची रक्कम बघून राममधीलबिझनेसमनजागा झाला आणि त्याने पूर्णवेळ छड्यांच्या बिझनेसमध्ये राहायचे ठरविले. त्याने ताबडतोबकुमार एंटरप्रायझेसया नव्या Sole Proprietership ची सुरवात केली आणि नव्या बिझनेसचा जन्म जानेवारी २०११ रोजी झाला. त्याने १० लाख रुपये नव्या बिझनेसमध्ये स्वत:चे भांडवल म्हणून टाकले. अर्थातच या उद्योगाचा मालक एकटा रामच होता. या उद्योगाचे पोटेंशियल लक्षात घेऊन रामनगर नागरी सहकारी बॅंकेने त्याला १० लाखांचे कर्ज दसादशे १०% अशा सवलतीच्या दराने दिले. रामनगरमध्ये सर्व कामे पटापट होत असल्यामुळे जानेवारी २०११ रोजी या सगळ्या गोष्टी पूर्ण करून नवा बिझनेस सुरू झाला.

कुमार एंटरप्रायझेसने सर्वप्रथम गावात १० लाखांना एक चांगले ऑफिस घेतले.अकाऊंटिंगच्या परिभाषेत या ऑफिसला "Asset" म्हणतात.हे ऑफिस १० वर्षे वापरले जाणे अपेक्षित होते (त्यानंतर नवीन जागेत स्थलांतर करायचा बेत होता). अजून १० वर्षांनी ऑफिसच्या जागेला काहीही किंमत येणार नाही असे गृहित धरू.म्हणजे ऑफिसची जाग घ्यायला आज दहा लाख रूपये खर्च केला असला तरी ती जागा आणखी दहा वर्षे वापरली जाणार आहे.म्हणूनच ऑफिस विकत घ्यायला आलेला १० लाख खर्च पूर्णपणे याच वर्षी दाखविता येत नाही.तर तो खर्च दहा वर्षांपर्यंत विभागून दाखवायचा म्हणजेच १० लाखांची Asset १० वर्षांच्या कालावधीत depreciate करायची आणि दरवर्षी लाख रूपये घसारा होतो. परत एकदा-- ऑफिस जरी या वर्षी घेतले असले तरी ते अजून १० वर्षे वापरले जाणार असल्यामुळे त्यासाठीचा खर्च एकाच वर्षी न धरता १० वर्षांच्या कालावधीत विभागायचा! तो खर्च दरवर्षी लाख रुपये येतो. (प्रत्यक्षात घसारा दरवर्षी सारखा म्हणजे लाख नसतो. त्याविषयी नंतरच्या कुठच्यातरी भागात. सध्यापुरते दरवर्षी लाख रूपये घसारा समजू)

रामने कामासाठी सेक्रेटरी आणि इतर स्टाफ नेमला. सुमंत कुमार हा त्याचा फायनान्स मॅनेजर होता. सुमंत आणि इतर स्टाफच्या पगारावर त्याला दरवर्षी लाख रुपये खर्च येणे अपेक्षित होते. तसेच ऑफिससाठी लागणारी स्टेशनेरी, वीज आणि पाण्याचे बील याचा खर्च दरवर्षी लाख रूपये येणार होता.बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज दरवर्षी लाख रूपये येणार होते. म्हणजे हा एकूण खर्च लाख रूपये होता. घसारा धरून हा खर्च लाख रुपये प्रतिवर्षी येणार! याचाच अर्थ त्याने दरवर्षी एक छडी विकली काय किंवा १० हजार छड्या विकल्या काय हा एकूण लाख रूपये खर्च स्थिरच होता. या खर्चाला Fixed Cost म्हणतात. याचे कारण हा खर्च किती छड्या विकल्या यावर अवलंबून नसतो आणि तर तो खर्च स्थिर असतो.

तर छड्या बनवायला लागणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च किती छड्या बनविल्या त्याच्यावर अवलंबून असतो.म्हणजे एकच छडी बनविली तर त्याला ९०० रूपये खर्च येईल आणि १० हजार छड्या बनविल्या तर एकूण ९०० गुणिले १० हजार = ९० लाख रूपये खर्च येईल. या प्रकारच्या खर्चाला Variable Cost म्हणतात कारण हा खर्च किती छड्या बनविल्या त्यावर अवलंबून असतो.

म्हणजेच कुमार एंटरप्रायझेसला होणारा एकूण खर्च: Fixed Cost + Variable Cost एवढा असेल. समजा एका वर्षातक्षइतक्या छड्या विकल्या तर Fixed Cost असेल लाख रुपये आणि Variable Cost असेल ९०० क्ष. म्हणजेच एकूण खर्च झाला लाख + ९०० क्ष.

समजा वर्षभरात छड्यांचा दर सारखाच राहिला (१५०० रूपये) तर त्यालाक्ष छड्यांपासून १५०० क्ष रुपये मिळतील.

म्हणजेच: एकूण प्राप्ती: १५०० क्ष
         एकूण खर्च: लाख + ९०० क्ष.

समजा राम वर्षात केवळ १००० छड्या विकण्यात यशस्वी झाला तर त्याचे एकूण उत्पन: १५०० गुणिले १००० = १५ लाख असेल. आणि एकूण खर्च लाख + ९०० गुणिले १००० = १७ लाख. याचाच अर्थ कुमार एन्टरप्रायझेसला लाखाचा तोटा होईल.

याउलट वर्षात ५००० छड्या विकल्या गेल्या तर एकूण प्राप्ती असेल: १५०० गुणिले ५००० = ७५ लाख रुपये. आणि एकूण खर्च लाख + ९०० गुणिले ५००० = ५३ लाख. याचाच अर्थ कुमार एन्टरप्रायझेसला २२ लाखाचा फायदा होईल.

छड्यांच्या संख्येबरोबर एकूण प्राप्ती आणि खर्च कसे बदलतील हे पुढील आकृतीत दाखवले आहे.

याचाच अर्थ ना-नफा ना-तोटा परिस्थितीसाठी एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च सारखे असले पाहिजेत.
म्हणजेच ना-नफा ना-तोटा परिस्थितीसाठी

१५०० क्ष = लाख + ९०० क्ष.

समिकरण सोडवून क्षची किंमत मिळते १३३३.३३, म्हणजे समजा १३३४.

याचाच अर्थ ना-नफा ना-तोटा परिस्थितीसाठी त्याला दरवर्षी १३३४ छड्या विकाव्या लागतील. त्यापेक्षा कमी छड्या विकल्यास बिझनेसला तोटा होईल तर त्यापेक्षा जास्त छड्या विकल्या गेल्यास बिझनेसला फायदा होईल. यातील १३३४ या ना-नफा ना तोटा बिंदूला 'Break-even point' म्हणतात.

कोणत्याही व्यवसायाची Profitability बघण्यासाठी हा Break-even point खूप महत्वाचा असतो.

तेव्हा या भागात बघितलेले महत्वाच्या संकल्पना पुढीलप्रमाणे:
. घसारा (Depreciation)
. Fixed cost
. Variable cost
. Break-even point   


Netbhet.com